उत्तर नागपूरमध्ये भव्य रामनवमी शोभायात्रा उत्साहात

29 Mar 2026 13:02:07
नागपूर ,
Railway Colony, Kamthi Road बेलिशॉप-मोतीबाग रेल्वे कॉलनी, कामठी रोड येथील ३२० वर्षे प्राचीन श्री शिव मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेचे यंदा २४ वे वर्ष साजरे करण्यात आले.शोभायात्रेपूर्वी प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. विलास डांगरे, विरेंद्र झा, पी. सत्याराव, जुगलकिशोर शाहू, शरद शर्मा, उमेश चौकसे, प्रकाशराव (गुंडू) आणि पी. विजयकुमार यांच्या हस्ते मंदिरातील राम-जानकी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच अष्टधातूच्या अभिषेक मूर्तींना सजवलेल्या रथावर विराजमान करून नगरभ्रमणासाठी प्रस्थान देण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे रामनामाचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले.
 
 
vbn
 
 
 
शोभायात्रेत आकर्षक रामरथ, सजीव झांक्या आणि रामनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. राम-जानकी, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सजीव झांक्या विशेष आकर्षण ठरल्या. लहान मुलांनी हनुमानाच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता.मार्गावर विविध संस्थांकडून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. Railway Colony, Kamthi Road  फुलांची उधळण करून रामभक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण मार्ग रंगोळ्यांनी सजवण्यात आला होता.रामनवमी निमित्त सकाळी सुंदरकांड पठण, दुपारी रामजन्मोत्सव, महिलांकडून बधाईगीत आणि अभिषेक असा धार्मिक कार्यक्रमही पार पडला.शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कुमार, सौरभ धुरिया, महंत पोतभरे, पवन तेम्बुर्णे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0