श्रीराम शोभायात्रेत सहभागी दोन विद्यार्थिनीस शिक्षकाची मारहाण

29 Mar 2026 18:14:37
अल्लीपूर, 
Shriram Shobhayatra: Student assault case येथील सेंट जॉन स्कूलमधील मुकेश भावे नामक शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी शनिवार २८ रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. जिल्ह्यात नुकताच रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. यातच अल्लीपूर येथील सेंट जॉन स्कूलमधील दोन विद्यार्थिनींनी शोभायात्रेत सहभाग नोंदविल्याने शुक्रवारी शिक्षकाने त्यांना मारहाण केली.
 
 
Shriram Shobhayatra
 
Shriram Shobhayatra: Student assault case  मुलींनी सायंकाळी घरी परतल्यानंतर याबाबतची पालकांना माहिती दिली. पालकांनी माजी खासदार सुरेश वाघमारे यांना माहिती दिल्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सुपारे, माजी सरपंच नितीन चंदनखेडे, बजरंग दलाचे अविनाश सुरकार, निखिल कातोरे, रोहित कलोडे यांनी पालक व मुलींना घेऊन शाळा गाठून मुख्याध्यापिका सिस्टर अतुल्या यांची भेट घेतली. यावेळी संबंधित शिक्षकाला पाचारण केले. त्यांना विद्यार्थिनींना मारहाण का केली, अशी विचारणा केली. याप्रसंगी इतर तक्रारी उपस्थित पालकांनी सांगितल्या. नंतर वाघमारे यांनी हिंगणघाटचे गटविकास अधिकारी अरविंद राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष टाकळे, अल्लीपूरचे ठाणेदार विजयकुमार घुले यांना बोलावून संबंधित विद्यार्थिनींचे बयाण नोंदवून घेतले.
 
 
...तर शाळाच बंद पाडू : वाघमारे
अल्लीपूर येथील सेंट जॉन हायस्कूलमधील विद्यार्थिनी राम नवमीच्या शोभायात्रेत राम-लक्ष्मण-सीतेच्या भूमिकेत सहभागी झाल्याने शिक्षकाने या विद्यार्थिनींना मारहाण केली. आपण स्वतः शाळेत जाऊन शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. शाळा व्यवस्थापन शिक्षकावर कारवाई करणार नसेल तर आम्ही शाळाच बंद पाडू, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दिली
Powered By Sangraha 9.0