टेबल टेनिस ओपन विदर्भ चॅम्पियनशिप

29 Mar 2026 22:49:37
पुसदचा पार्थ पवार विदर्भात द्वितीय, इशांत चांडक तृतीय
ओपन मेन्स इव्हेंट प्रसाद तृतीय स्थानावर

पुसद, 
Table tennis tournament वर्धा टेबल टेनिस टेबल टेनिस ओपन विदर्भ स्पर्धा पार पडली. यात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अंडर १९ आणि मेन्स ओपन अशा दोन गटांत सामन्यांचे आयोजन करण्यात आले. सर्वात महत्वाचा इव्हेंट मेन्स ओपन म्हणून मानल्या जातो. यात पुसदचा प्रसाद देशपांडे हा उपांत्य सामन्यात सध्या नागपूरतर्फे खेळणार्‍या मुंबईच्या रजत तडस्कर सोबत झाला. या स्पर्धेमध्ये प्रसादला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
 
 
vinar
 
Table tennis tournament  अंडर १९ बॉईजमध्ये पुसदचा पार्थ पवार सुरवातीपासून आपल्या आक‘मक व सुंदर खेळाच्या जोरावर सामन्यात अंतिम सामन्यापर्यंत पोहचला त्याला अकोल्याच्या रियाकडून हार पत्करावी लागली. उपांत्य सामनामध्ये इशांत चांडक पार्थकडून पराभूत झाला. तो तृतीय स्थानावर राहिला. तसे पाहिलं तर दोघेही अंडर १४ खेळाडू आहे. दोघेही पुसदच्या माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये शिक्षण घेतात. प्रसाद देशपांडेदेखील याच शाळेत टेबल टेनिस प्रशिक्षक आहे. एकंदर गुरू आणि शिष्य विदर्भात नावलौकिक वाढवत आहेत. संपूर्ण विदर्भात तिघांच्या खेळाचे खूप कौतुक होत आहे. पार्थ आणि इशांत यांची वार्षिक परीक्षा सुरू असूनदेखील त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सामने खेळू देण्यास द्यावी, ही पण कौतुकाची बाब आहे. ते आपल्या विजयाचे श्रेय आईवडील, प्रसाद व अविनाश देशपांडे यांना देतात.
Powered By Sangraha 9.0