अबब...होर्मुझनंतर हा सागरी मार्ग संकटात सापडेल का?

29 Mar 2026 09:48:15
तेहरान,
twin crisis over oil and trade मध्यपूर्वेतील तणाव आता अधिक धोकादायक वळणावर पोहोचताना दिसत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आता हुथी बंडखोर उघडपणे उतरले आहेत. त्यांनी प्रथमच थेट इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आतापर्यंत काही प्रमाणात बाजूला राहिलेल्या हुथींनी अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे. येमेनमधील राजधानी सना आणि मोठा भूभाग त्यांच्या ताब्यात असून, त्यांनी यापूर्वीही गाझा युद्धाच्या काळात इस्रायलला लक्ष्य केले होते. मात्र यावेळी परिस्थिती अधिक मोठी आणि धोकादायक असल्याचे संकेत आहेत.
 
tehran
 
खरा धोका केवळ क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरता मर्यादित नाही, तर सागरी मार्गांवर निर्माण होणाऱ्या संकटाचा आहे. बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग लाल समुद्र आणि एडनच्या आखाताला जोडतो. जागतिक व्यापारातील सुमारे १२% मालवाहतूक या मार्गाने होते. twin crisis over oil and trade जर या ठिकाणी अडथळे निर्माण झाले, तर त्याचे परिणाम थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी आधीच तणावाखाली आहे. जगातील जवळपास २०% तेलवाहतूक या मार्गाने होते. जर हे दोन्ही महत्त्वाचे मार्ग एकाच वेळी बाधित झाले, तर जागतिक पुरवठा साखळीला मोठा धक्का बसू शकतो.
 
याचा सर्वात मोठा परिणाम तेलाच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. आखाती देशांकडून पुरवठा कमी झाला, तर पेट्रोल-डिझेल दर वाढू शकतात. तसेच जहाजांना आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपमार्गे वळसा घ्यावा लागल्यास प्रवासाचा कालावधी आणि खर्च दोन्ही वाढतील, ज्याचा थेट परिणाम महागाईवर होईल. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर मोठा परिणाम होऊ शकतो. twin crisis over oil and trade ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, कारण ही क्षेत्रे तात्काळ पुरवठा साखळीवर अवलंबून असतात.
 
याआधीही हुथींनी लाल समुद्रात जहाजांवर हल्ले केले असून सौदी अरेबिया आणि यूएईमधील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सागरी अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. twin crisis over oil and trade दरम्यान, अशा कारवायांना अमेरिका आणि इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर मिळू शकते, ज्यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला जगाचे लक्ष हुथींच्या पुढील पावलांवर केंद्रित आहे—कारण त्यावरच या संघर्षाचे भवितव्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र अवलंबून आहे.
Powered By Sangraha 9.0