- देवरी-आमगाव राज्य महामार्गावरील घटना
गोंदिया,
Truck's apghat ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आमगाव-देवरी राज्य महामार्गावर हरदोली गाव शिवारात घडली. मनीष उदाराम जनबंधू (३०) रा. हरदोली असे मृत युवकाचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
Truck's apghat मिळालेल्या माहितीनुसार मृत मनीष हा त्याच्या मित्राला सोडून दुचाकीने स्वगृही जात असताना देवरीकडून आमगावच्या दिशने येणार्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. ज्यामध्ये मनीषचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालकाने घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.