कामाच्या तासांचे संमिश्र-संकरित स्वरूप

    दिनांक :03-Mar-2026
Total Views |
employee working hours ‘कोरोना’ नंतरच्या बदलत्या व्यावसायिक परिस्थितीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास संमिश्र आणि संकरित स्वरूपाचे झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा फायदा कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांनाही झाला. तेव्हा, नेमके हे बदल कोणते? त्याचे दिसून आलेले सकारात्मक परिणाम, याचा आढावा घेणारा हा लेख...

working hours 
 
 
‘कोरोना’दरम्यानचा कठीण कालावधी संपून आता पाच वर्षांवर अवधी लोटला. विभिन्न कंपन्यांच्या कार्यालयांमधील कामाचे तास आणि बदलत्या आणि लवचीक कामाचे स्वरूप ही नवी कार्यपद्धती सर्वांच्या अंगवळणी पडली असून अद्याप या नव्या कामकाज पद्धतीचा अनेक ठिकाणी स्वीकार-अंगीकार होत असलेला दिसून येतो. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी दरम्यानच्या काळात आधीच्या वा जुन्या हजेरी पद्धतीची केलेली सुरुवात पण नव्याने मोडीत काढून नव्या व लवचीक म्हणजेच कर्मचारी आणि कंपन्यांच्या कामाशी निगडित व आवश्यक अशा सुधारित कामाच्या तासांचा व त्यानुसार काम करण्याच्या पद्धतीचा स्वीकार केल्याचे दिसून येते. यातूनच नव्याने कामाच्या संमिश्र वा संकरित स्वरूप आणि कार्यपद्धती विकसित झाली आहे.
‘कोरोना’नंतरच्या सुमारे पाच वर्षांत कंपन्यांतर्गत कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि कामांच्या तासांसह कार्यपद्धती इत्यादींवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्यातून एक बाब प्रामुख्याने स्पष्ट झाली की, कोरोनादरम्यान व त्यानंतरच्या बदलत्या व बदललेल्या व्यावसायिक कार्यालयीन कार्यपद्धती व कामकाजामध्ये बदलती परिस्थिती व गरजांनुसार बदल करणे व करीत राहणे, त्याचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरणार असून त्याचा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे.
  
हेच विचार-विचारसरणी व नव्या अनुभवांमधून पुढे आली, ती नव्या स्वरूपातील व लवचीक अशी संयुक्त स्वरूपातील संकरित कार्यपद्धती. या नव्या कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या लवचीकतेला बदलत्या व्यावसायिक कार्यपद्धतीची व परंपरागत आणि संकरित स्वरूपाची नवी व विकसित कार्यपद्धती. या नव्या संकरित पद्धतीमध्ये परंपरागत व कोरोनापूर्व काळातील कंपनी-कार्यालयीन कार्यपद्धती व त्यानंतर कोरोना काळात उपयुक्त ठरून विकसित झालेली संयुक्त स्वरूपातील विकसित अशी संकरित स्वरूपातील कार्यपद्धती. या नव्या कामकाज पद्धतीचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे नवे व विकसित स्वरूप हे प्रामुख्याने आव्हानात्मक स्वरूपातील निर्माण व विकसित झालेली अशी ही कामकाज पद्धती ठरली. त्याच्याच जोडीला या नव्या व कधी अकल्पित वाटणारी व्यावसायिक कार्यपद्धती विकसित झाली, हे यासंदर्भात उल्लेखनीय.
 
प्रचलित परिस्थितीत व विशेषतः कोरोनानंतरच्या बदलत्या व्यावसायिक परिस्थितीच्या अभ्यासावरील आपला अनुभव नमूद करताना ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग’ या विख्यात व्यवसाय व्यवस्थापन-मार्गदर्शन कंपनीच्या तंत्रज्ञान विकास क्षेत्राचे प्रमुख नितीन भट यांनी नमूद केल्यानुसार, त्यादरम्यान कंपनी अंतर्गत कर्मचाèयांची कामाच्या ठिकाणची प्रत्यक्ष वा शारीरिक उपस्थिती, ते करीत असणारे कामकाज, या कामाचे स्वरूप, त्यांची उत्पादकता, कामाचा प्रत्यक्ष दर्जा व त्याचे व्यावसायिक परिणाम इ.वर व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थांनी अधिक गांभीर्याचे विचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते, याच विचार-प्रक्रियेमध्ये नवी कामकाज व व्यवस्थापन पद्धतीतील बदलांचे मूळ दिसून येते. याच विषयाचा अधिक पाठपुरावा करण्यासाठी 2025 मध्ये ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग’ कंपनीतर्फे व्यापक स्वरूपाचे सर्वेक्षण करण्यात आले.employee working hours या सर्वेक्षणामध्ये सुमारे 1 हजार 500 कंपन्या व 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावरून सर्वेक्षणाच्या प्रतिसादाची कल्पना येऊ शकते. सर्वेक्षणात विविध स्वरूपात काम करणाऱ्या 29 उद्योग-व्यवसायांचा समावेश होता.
 
वरील सर्वेक्षणात प्रामुख्याचे दिसून आलेली बाब म्हणजे, ज्या उद्योग-कंपन्यांमध्ये लवचीक कार्यपद्धती आणि कामाचे तास म्हणजेच संमिश्र वा संकरित कार्यपद्धती आहे, अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे कामकाज तुलनेने अधिक उत्पादक आहे. याउलट परिस्थिती परंपरागत पद्धती वा पठडीसह काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये दिसून आली. सर्वेक्षणातून दिसून आलेले कंपनी व कर्मचारी या उभय घटकांच्या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, ज्या उद्योग-व्यवसायात व्यवस्थापन, व्यवस्थापक आणि तिथे काम करणारे कर्मचारी यांच्यादरम्यान संवाद आणि परस्पर विश्वास आहे, अशा ठिकाणी संकरित म्हणजेच कर्मचाèयांनी कंपनीची व्यावसायिक गरज व कर्मचाèयांची सोय-सुलभता यावर आधारित कामकाज ही नवी कार्यपद्धती अधिक परिणामकारकपणे काम करणारी ठरते व त्याचा लाभ उद्योगाच्या या उभय घटकांना होतो.
 
यानिमित्ताने कर्मचाèयांचा कंपनीचे कामकाज, कामाची पद्धत व कामाचे तास या दृष्टीने पाहता 22 टक्के कर्मचाऱ्यानी कुठूनही काम करण्यास तर त्याहून अधिक म्हणजेच 30 टक्के कर्मचारी कंपनी व्यवस्थापनाच्या नियोजन वा प्राधान्यक्रमानुसार निर्धारित पद्धतीने व कामाच्या तासांसह काम करण्यास पसंती दिली. यावरून कामकाज, कामाची पद्धत व मुख्य म्हणजे कामाचे तास यासंदर्भातील कर्मचाऱ्यांची मानसिकता स्पष्ट होते. यासंदर्भात ‘चीफ पीपल अ‍ॅण्ड कल्चर सर्व्हिसेस ऑफिसर’ म्हणून मानव-संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशांत मेहरा यांच्या मते, या सर्वेक्षणातून स्पष्ट झालेली महत्त्वाची बाब म्हणजे, कर्मचारी कंपनीचा व्यवसाय-कामकाज आणि कामाची पद्धत याबरोबर कर्मचाऱ्यांचे काम व कामाचे तास या उभयपक्षी महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या मुद्यांवर आपले मत आणि अपेक्षा इ. मुद्दे अधिक मोकळेपणाने मांडू लागले आहेत.
 
त्यांच्यानुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नव्यानेच रुजू झालेले व युवा-वयोगटातील कर्मर्चायांच्या दृष्टीने कंपनीचे कामकाज लवचीक वा संमिश्र तासांसह करण्याच्या सोयीला या तरुण वयातील कर्मचाऱ्यांची पहिली पसंती व प्राधान्य आहे. त्यांच्या मते, या आणि अशा कार्यपद्धतीमुळे कंपनीचे कामकाज आणि कर्मचाऱ्यांचे काम या उभयतांना त्याचा फायदा होऊ शकतो. व्यवस्थापनाचा कर्मचाऱ्यांचे काम आणि त्यांचे कामाचे तास यावर आग्रही भर देण्यावरचा कलही आता कमी होत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणातील सहभागी प्रमुख व्यवस्थापन प्रतिनिधी वा व्यवस्थापकांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतांनुसार, बदललेली वा बदलती व्यावसायिक स्थिती, कार्यालयीन व्याप व त्यावर होणारा खर्च, मर्यादित साधनांसह व्यावसायिक स्पर्धेवर मात करून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने कंपनी-कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर विश्वास आणि जबाबदारीची जाणीव असेल, तर कंपनीच्या व्यावसायिक प्राधान्यावर आधारित लवचीक कामांच्या तासासह संमिश्र वा संकरित कार्यपद्धती हा सद्यस्थितीत उत्तम पर्याय ठरू शकतो.
दत्तात्रेय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)