लोककलावंत राम झिले यांचा सत्कार

30 Mar 2026 21:37:29
वणी, 
वणी तालुक्यातील निळापूर येथील लोककलावंत Ram Jile राम झिले यांना महाराट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ बुधवार, 25 मार्च रोजी प्रदान करण्यात आला. या गौरवपूर्ण यशानिमित्त विदर्भ साहित्य संघ वणी शाखा व नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप अलोणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावर तसेच योगशिक्षक लक्ष्मण इद्दे व प्रा. अभिजित अणे उपस्थित होते.
 
 
Ram jikdsksl
 
Ram Jile  राम झिले यांनी गेल्या 40 वर्षांपासून नकलांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, स्वच्छता व विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व निस्वार्थ कार्याची दखल घेत शासनाने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राम झिले यांच्या चार दशकांच्या कार्याचा गौरव करत शासनाने योग्य व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते राम झिले यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राम झिले यांनी त्यांचा खडतर जीवनप्रवास उलगडून दाखवत मिळालेला पुरस्कार आपल्या पत्नीला समर्पित करत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजित अणे यांनी आणि आभारप्रदर्शन राजेश महाकुलकर यांनी केले.
Powered By Sangraha 9.0