नागपूर,
BEd entrance exam राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या बीएड (जनरल, स्पेशल) व बीएड (ईएलसीटी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नागपूरमधील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता ५ एप्रिल रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.
नवीन परीक्षा केंद्र म्हणून इसासनी येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सुधारित परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर तपशील नोंदणीकृत ईमेल व मोबाईलवर पाठविण्यात येणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनी आपले अद्ययावत प्रवेशपत्र लॉगिन आयडीमधून डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यातील बीएड प्रवेश पात्रता परीक्षा २७ मार्चपासून सुरू झाली होती. मात्र, नागपूर केंद्रावर सर्व्हर न सापडल्याने सलग दोन दिवस परीक्षा होऊ शकली नाही. या प्रकारामुळे परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. परिणामी, संबंधित केंद्रावरील परीक्षा रद्द करून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
याचबरोबर, सामाजिक न्याय BEd entrance exam विभागाने शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांबाबत महत्त्वाचा शासन निर्णयही घेतला आहे. इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतही वसतिगृहात राहण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून ते एमएचटी-सीईटी, नीट आणि जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतील. मात्र, या कालावधीत भोजन, भत्ता किंवा इतर सुविधा दिल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय मिळणार असली तरी आर्थिक मदतीअभावी काही अडचणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.