इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने

30 Mar 2026 16:36:06
नागपूर,
Class 11 admission इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर करत राज्य शिक्षण विभागाने यंदा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 

Class 11 admission online Maharashtra 
या नव्या पद्धतीनुसार, केवळ राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करणे अपेक्षित आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे राबवली जाणार असून, शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रक्रिया सुरू राहील. विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीएपी) तसेच आरक्षित जागांच्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे.प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून ‘अर्ज क्रमांक १’ भरावा लागेल आणि त्याची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर ‘पर्याय अर्ज’ सादर करताना इच्छित महाविद्यालयांचे पर्याय नमूद करावे लागतील. महाविद्यालयांचे वाटप झाल्यानंतर प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्यास पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी उपलब्ध राहील.

ऑनलाइन प्रणालीमुळे प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक
मागील वर्षी नागपूर Class 11 admission विभागात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याचे चित्र समोर आले होते. एकूण २ लाख २१ हजार ३१५ प्रवेश क्षमतेपैकी ८५ हजार ३७० जागा रिक्त राहिल्या, तर नागपूर शहरातच ४१ हजार ८७९ जागा भरल्या गेल्या नव्हत्या. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतही अशाच प्रकारची स्थिती होती. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रणालीमुळे प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0