स्व. दत्ता मेघे यांच्या नावाने उभारणार सांस्कृतिक भवन

30 Mar 2026 21:13:20
पवनार, 
datta-meghe : पवनार हे गाव स्व. दत्ता मेघे यांची जन्मभूमी, कर्मभूमी असल्याने त्यांचे नाव अजरामर रहावे या हेतूने पवनार येथे त्यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह उभारणार असल्याची घोषणा विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी केली.
 
 
MJK
 
 
 
स्व. दत्ता मेघे यांची रक्षा विसर्जनाला आले असता त्यांनी ही घोषणा केली. याबाबत ग्रामपंचायत आपल्या मालकीची जागा देणार असून ठराव घेऊन पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे. दत्ता मेघे यांची प्रतिमा ग्रामपंचायतीला भेट दिली असता प्रशासक राजू गलांडे यांना याबाबत अवगत केले असून कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे त्यांनी आश्वासित केले. त्याच बरोबर पवनार टीबी मुत झाल्यामुळे ग्रापं अधिकारी वासुदेव राऊत व राजू गलांडे यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी जयंत गोमासे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, अनंत महाराज साटोणे, ग्रापं माजी सदस्य प्रशांत भोयर, हरिहर अंबुलकर, दिनकर बोरकर, तुषार कडू, शंतनू चकोले, भूषण वाटमोडे, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0