डॉ. पी. के. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार

30 Mar 2026 21:59:16
नागपूर, 
प्रख्यात ज्येष्ठ हृदयरोग शल्यचिकित्सक Dr. P. K. Deshpande डॉ. पी. के. देशपांडे यांना मुंबईत नुकत्याच झालेल्या इंडियन असोसिएशन ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जन्सच्याच्या वार्षिक परिषदेत प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नीता मुकेश अंबानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
 
pk
 
हृदयरोग शल्यचिकित्सेच्या क्षेत्रातील Dr. P. K. Deshpande  डॉ. देशपांडे यांचे उत्कृष्ट योगदान, रुग्णसेवेसाठीचे त्यांचे आजीवन समर्पण व भारतातील हृदयविज्ञानाच्या प्रगतीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्यात आली. देश-विदेशातील आघाडीचे हृदयरोग शल्यचिकित्सक, संशोधक व आरोग्यसेवा व्यावसायिक सहभागी झाले होते. जीवनगौरव पुरस्कार हा वैद्यकशास्त्राप्रति असलेल्या त्यांच्या अविचल वचनबद्धतेचा उल्लेखनीय सेवेचा पुरावा आहे.
Powered By Sangraha 9.0