अमरावती जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस

30 Mar 2026 21:32:28
अमरावती,
unseasonal-rain-in-amravati : जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये दुपारी ४ वाजतानंतर अवकाळी पावसासह काहीवेळ गारपीट झाली. संध्याकाळी ७.३० वाजता अमरावती शहर व आजुबाजुच्या भागात विजेच्या कडकडाटासह हलका पाऊस आला.
 
 
KL
 
हवमान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार अचलपूर, चिखलदरा, दर्यापूर, अंजनगाव या तालुक्यातल्या काही भागांमध्ये किरकोळ व मध्य स्वरूपाचा पाऊस होऊन गारपीट झाल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या उर्वरीत भागात हलक्या पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात आज दिवसभर कधी उन्ह तर कधी ढगाळ वातावरण होते. अमरावती शहरात संध्याकाळी ७.३० नंतर आकाक्षात काळे ढग दाटून आले व विजांच्या कडकडाटात तुरळ पाऊस सुरू झाला. शहराला लागून असलेल्या भागातही पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने काही प्रमाणात शेतात राहीलेल्या गव्हाचे व संत्रा, आंब्याचे नुकसान झाले आहे.
Powered By Sangraha 9.0