खेलो इंडिया महिला संघाचे प्रशिक्षक आणि कबड्डी पटू पदी दोघांची निवड

30 Mar 2026 21:05:45
मानोरा, 
khelo-india-womens-team : तालुक्याचे क्रीडाभूषण मनोज प्रकाश राठोड यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. रायपूर (छत्तीसगड) येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. याचबरोबर देवठाणा येथील जय सेवालाल क्रीडा मंडळातील सलोनी गजानन शिंदे हिची देखील खेळाडू म्हणून निवड झाल्याने तालुयाचा मान उंचावला आहे.
 
 
J
 
मनोज राठोड हे इंदिरा गांधी कन्या विद्यालय, मानोरा येथे कार्यरत असून, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत अनेक गोरगरिब खेळाडूंना घडवले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. जय सेवालाल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली क्रीडा चळवळ आज मानोरा तालुयाची ओळख बनली आहे. सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि प्रामाणिक कार्याचा गौरव म्हणूनच त्यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सलोनी शिंदे हिच्या निवडीमुळे तालुयातील महिला क्रीडापटूंना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
 
 
विदर्भ अ‍ॅम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर आणि मार्गदर्शक सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल वाशीम जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राम नवघरे, राजू अढाऊ, डॉ. भागवत महल्ले तसेच विदर्भ अ‍ॅम्युचर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, जय सेवालाल क्रीडा मंडळाचे सदस्य आणि जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
 
 
मानोरा तालुक्यासाठी ही दुहेरी आनंदाची व अभिमानाची बाब ठरली असून, या यशामुळे तालुयातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी नवी प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातूनही मोठे यश मिळवता येते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0