आर्वी,
mann-ki-baat : वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाने राजकीय आणि रचनात्मक कार्याचा एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० टके आयोजन करून आर्वी विधानसभेने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे आमदार सुमित वानखेडे यांचे कुशल नियोजन, पदाधिकार्यांची सक्षम फळी आणि बूथ प्रमुखांची मेहनत यांचा त्रिवेणी संगम ठरला आहे.
आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुयातील ३१० पैकी ३१० बूथवर एकाचवेळी कार्यक्रम पार पडणे, हे एका मोठ्या ‘टीम वर्क’चे फलित आहे. तालुका आणि शहर पातळीवरील पदाधिकार्यांनी प्रत्येक विभागाची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. तर बूथ प्रमुखांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून ५ हजार १५५ नागरिकांना या उपक्रमाशी जोडले. बूथ प्रमुखांनी घराघरांत जाऊन नागरिकांना निमंत्रित केले. पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बूथवर झालेल्या या शिस्तबद्ध आयोजनामुळेच आज आर्वीचे नाव राज्याच्या पटलावर चमकले आहे.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतानाच आमदार सुमित वानखेडे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांनी वेळोवेळी पदाधिकारी आणि बूथ प्रमुख यांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांच्यात सलोखा निर्माण केला. नेता हा केवळ दिशा दाखवतो, पण ती वाटचाल कार्यकर्त्यांच्या बळावरच यशस्वी होते, हा विश्वास आ. वानखेडे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांची जोडगोळी नेहमीच तत्पर असते.
एकाचवेळी ३१० केंद्रांवर अशाप्रकारे १०० टके उपस्थिती लावणे, हे आर्वीच्या राजकीय परिपवतेचे लक्षण मानले जात आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवरील कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळेच आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्त्वाला ही भरघोस पावती मिळाली आहे. तसेच आगामी काळासाठी कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.