कारंजात रामनवमी शोभायात्रेत सामाजिक एकतेचा संदेश

30 Mar 2026 21:18:55
कारंजा (घा.), 
ram-navami-procession : रामनवमीनिमित्त कारंजा येथे शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, जय श्री राम च्या घोषणा देत गजानन महाराज देवस्थान येथून यात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या आकर्षक मूर्ती, सजवलेले रथ, पारंपरिक वेशभूषा आण सांस्कृतिक कलाकृतींनी वातावरण भक्तिमय केले. जागोजागी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या शोभायात्रेतील वाहनांचे चालक योगायोगाने मुस्लिम होते. त्यामुळे येथे सामाजिक एकतेचा संदेश देणारी श्रीराम शोभायात्रा ठरली.
 
 
Untitled-1
 
कारंजा शहरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम नवमी उत्सव समिती व नितीनभाऊ दर्यापुरकर मित्र परिवार यांच्या वतीने शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे श्रीराम नवमी शोभायात्रा प्रचार प्रसार निमित्ताने महिलांनी घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. त्यामुळे शोभायात्रेत महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. विशेषतः शोभायात्रेत सामाजिक ऐयाचे वातावरण पाहायला मिळाले. श्रीराम व झाकी असलेल्या रथाचे सारथी मुस्लिम होते. शोभायात्रा गोळीबार चौक, मुख्य मार्गाने जयस्तंभ चौक येथे महाआरतीने समारोप करण्यात आला. महाआरती प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीराम नवमी आयोजन समिती प्रमुख नितीन दर्यापूरकर यांनी आभार मानले .
Powered By Sangraha 9.0