नागपूर,
metro tracks मेट्रोच्या ट्रॅकवर फिरत असलेल्या सायाळला पकडून ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचार्यांनी निसर्गमुक्त घटना रविवारी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ घडली. रविवारी पहाटे ५ वाजता ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरला मेट्रो रेल्वेच्या कर्मचार्यांनी कॉल करून एअरपोर्टच्या पुढील स्टेशनजवळ जमिनीवर येणार्या मेट्रो ट्रॅकवरून सायाळ ट्रॅकवर चढल्याची माहिती दिली.
metro tracks ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरचे वनरक्षक प्रतीक घाटे, चेतन बारस्कर यांना माहिती मिळताच ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे पोहोचले. मेट्रो रेल्वेच्या फिरत असलेल्या सायाळला पकडण्यासाठी मेट्रो ट्रॅकवर धावावे लागले. अखेर त्यांनी मेट्रो ट्रॅकवर फिरत असलेल्या सायाळला सुरक्षितरीत्या पकडले. सायाळ जखमी नसल्याची खात्री केल्यानंतर या कर्मचार्यांनी त्या सायाळला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या वनरक्षकांच्या मदतीने सायाळ सुरक्षितरीत्या आपल्या नैसर्गिक अधिवासात जाऊ शकला.