वणी येथे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी

30 Mar 2026 21:40:45
214 प्रकरणांचा निपटारा, 7.48 कोटींची वसुली

वणी, 
National Lok Adalat येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात व यशस्वी पार पडली. या लोकअदालतमध्ये एकूण 214 प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन तब्बल 7,48,94,451 रुपये (सात कोटी अठ्ठेचाळीस लाख चौèयाणव हजार चारशे एकावन्न) इतकी वसुली करण्यात आली.
 
 
courat
 
National Lok Adalat  या लोकअदालतीसाठी पॅनेल 1 चे प्रमुख म्हणून न्या. जोंधळे यांनी काम पाहिले. तर पॅनेल 2 चे प्रमुख म्हणून न्या. शहाजी दत्तराव भोसले यांनी जबाबदारी सांभाळली. यामध्ये अ‍ॅड. नुसरत सिद्दीकी व अ‍ॅड. सोनल चटप यांनी पॅनेल सदस्य म्हणून सहभाग घेतला. या लोकअदालतमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला. बँक व पतसंस्थांच्या दाखलपूर्व 77 प्रकरणांमध्ये 6,62,95,921 रुपये वसुली झाली. ग्रामपंचायत कर व पाणी वसुलीच्या 7 प्रकरणांत 18,87,666 रुपये मिळाले. चेक बाऊन्सच्या 19 प्रकरणांत 26,55,087 रुपये वसूल करण्यात आले, ज्यापैकी दोन प्रकरणे पाच वर्षांहून अधिक जुनी होती. याशिवाय दिवाणी 15 प्रकरणांत 40,32,077 रुपये वसुली करण्यात आली. यामध्ये 10 वर्षांहून जुने एक प्रकरण व पाच वर्षांहून अधिक जुनी दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. किरकोळ गुन्ह्यांच्या 96 प्रकरणांत 13,700 रुपये वसुली झाली. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मोठ्या संख्येने पक्षकार, वकील, बँक व पोलिस अधिकारी उपस्थित होते. यासाठी न्यायाधीश व कर्मचाèयांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0