प्रसादनगर वस्तीचे हिंदू संमेलन उत्साहात

30 Mar 2026 16:47:36
नागपूर,
Hindu Sammelan जयताळा मार्गावरील प्रसादनगर वस्तीचे सकल हिंदू संमेलन उत्साहात झाले. यानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात पुरुषांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
 

 Prasadnagar Hindu Sammelan Nagpur, 
पाककला स्पर्धेत प्रसादनगर, हिरणवार ले-आऊट, आनंदनगर, अष्टविनायक नगर व जयताळापर्यंतच्या स्पर्धकांनी भाग घेतला. परीक्षक कल्याणी देशमुख व मेधा पाळधीकर होत्या. पाककला स्पर्धेत प्रथम माधवी मुठाळ, द्वितीय संजीवनी हातवळणे, चित्रकला स्पर्धेत प्रथम अवंतिका वैद्य, द्वितीय वैदेही शेंडे, रांगोळी स्पर्धेत प्रथम शुभांगी हडप, कल्याणी राव, त्रिषा जमाईवार, द्वितीय मनीषा ठाकरे, अश्विनी फडके, सुमेधा, श्लोक स्पर्धेत प्रथम विद्या कुलकर्णी, द्वितीय प्रीती खोडे तसेच क्रीडा स्पर्धेत मुलांना सांघिक बक्षिसे वितरित करण्यात आली.
सकल हिंदू संमेलनाला भाग संघचालक Hindu Sammelan  दीपक देशपांडे, मुख्य वक्ते सतीश किटकरू, रेणुका जांभोरकर, नगर संघचालक रंजीव सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गोमाता पूजनाने सुरुवात झाली.सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. देवीचा गोंधळवर जीविका भेंडे हिने नृत्य केले. हिरणवार ले-आऊटमधील महिलांनी भजन सेवा सादर केली. सतीशी किटकरू यांनी पंचपरिवर्तन आजची सामाजिक गरज असल्याचे सांगत नागरिक कर्तव्ये, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन यांचे पालन करण्यास सांगितले.
रेणुका जांभोरकर मूलभूत गरजा, समाज सुधारणेची आवश्यकता, सतर्कता, मातृशक्तीद्वारे सामाजिक, कौटुंंबिक सुधार यांची गरज व्यक्त केली. महिला शक्ती ही केवळ चूल वण मूल इथपर्यंत सीमित नसून संपूर्ण विश्वात मान्यता पावलेली प्रभावी आदिशक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. दीपशिखा पाथरकर, शर्मिला चौरसिया, भाग्यश्री कुलकर्णी, संस्कृती भेलोंडे, अपूर्णा नेटके, तृप्ती मेश्राम, नीता धुमाळ, मनीषा फिरके, केशव-माधव नगर, हिरणवार ले-आऊटमधील महिलांसह प्रसादनगर शाखेने संमेलनासाठी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0