वरूड,
warud-market-committee : वरूड नगर परिषदेकडून ३१ मार्चपर्यंत कर भरणा करण्याबाबत वेळोवेळी अवगत करून सुद्धा मुदतीच्या आत कर भरणा न करणार्या मालमत्ता धारकास नोटीस बजावून कर वसूलीबाबत धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती अधिनियमा अन्वये मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत नोटीस व सूचना दिल्या होत्या. परंतु, मालमत्ता धारकाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी कर अधिकारी गौरव इंगोले यांचे नावे अधिपत्र काढून सदरहू मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. त्यानूसार कर अधिकारी यांनी कार्यवाही करण्याबाबतची आखणी करून संपूर्ण नगरपरिषद कर्मचार्यांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालमत्ता क्रमांक ८४७ व ८४९ अंतर्गत ११ दुकानगाळे, ६ गोडाऊन, १ प्रशिक्षण केंद्र, १ प्रयोगशाळाची अटकावनी केली. तसेच शहरातील सर्व थकबाकीदार मालमत्ता धारकांनी थकीत व चालू कराचा भरणा ३१ मार्च पूर्वी करून नगर परिषदेस सहकार्य करावे व जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.