मुंबई,
Rajat Dalal in marriage फिटनेस क्षेत्रात प्रसिद्ध असलेला रजत दलालने लग्न केल्याचे जाहीर केली आहे.त्याने लग्नाचे काही सुंदर छायाचित्रे प्रसिद्ध करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याचे सांगितले. यामध्ये रजतने आपल्या पत्नीचा हात धरलेला असून दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत आहे. पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक वेशात तो आकर्षक दिसत असून डोक्यावर पगडीही परिधान केलेली आहे. त्याची पत्नी लाल रंगाच्या सुंदर पोशाखात अधिकच उठून दिसत आहे. या छायाचित्रांना त्याने “जीवनाच्या नव्या टप्प्याची सुरुवात” असे अर्थपूर्ण शब्दांत वर्णन दिले आहे. अलीकडेच रजत एका लोकप्रिय कार्यक्रमात झळकला होता आणि त्याच्या खेळाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. त्याआधी बिग बॉस १८ मध्ये तो त्याच्या तापट स्वभावामुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत होता. त्याचे नाव अभिनेत्री चाहत पांडे हिच्यासोबत जोडले जात असतानाच त्याने अचानक लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.