‘संघ गंगा के तीन भागीरथ’ नाटकाने केले मंत्रमुग्ध

30 Mar 2026 21:22:40
चंद्रपूर, 
drama-chandrapur : भारतीय सद्विचार प्रसारक मंडळ चंद्रपूरच्या वतीने तारारानी फाउंडेशन नागपूर-पुणे प्रस्तुत ‘संघ गंगा के तीन भागीरथ’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित दोन अंकी हिंदी नाटक 28 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता येथील प्रियदर्शिनी सभागृहात सादर झाले. अगदी शेवटपर्यंत नाटकाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 
 
K
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या तीन पूजनीय सरसंघचालकांचे जीवनचरित्र तथा त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा नाटकात चित्रित करण्यात आली आहे. या नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे, दिग्दर्शक संजय पेंडसे, सारिका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, तर संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे होते.
 
 
यावेळी राज्याचे आदिवासी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, भारतीय सद्विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप पोशट्टीवार, सचिव अरुण मदनकर यांच्यासह नगरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0