अजब रेल्वे स्टेशन गजब प्रवाशी

30 Mar 2026 21:19:59
सिंदी रेल्वे,
sindhi-railway-railway-station : येथील रेल्वे स्थानकाला अजबच रेल्वे स्टेशन म्हणावे लागेल कारण येथील प्रवाशीच गजब असुन येथे याचाच वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
 

K  
 
सिंदी रेल्वे हे दक्षिण रेल्वे मार्ग मध्य रेल्वे मार्गावरुन वेगळा होण्याअगोदरचे महत्त्वाचे आणि मोठे आणि प्रसिद्ध रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन एवढे पुरातन आहे कि सिंदी शहराला सिंदी रेल्वे नावानेच ओळखले जात असुन शासकीय रेकार्डला सुद्धा हेच नाव नोंद आहे आणि आतातर पुन्हा प्रसिद्ध झाले कारण येथे नव्याने अस्तित्वात आलेले डायपोर्ट आणि समृद्धी महामार्ग लागुन असल्याने या रेल्वे स्थानकाला अन्यन साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत येथे असलेल्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, कोरोना काळात रेल्वे विभागाने येथील सुपर आणि पॅसेंजर गाड्याचे थांबे बंद केले होते. ते पुर्ववत सुरू न केल्याने जन आंदोलनाच्या मागण्यांनंतर काही गाड्यांचे थांबे दिलेत. मात्र, अद्याप काही गाड्यांचे थांबे पुर्ववत केलेले नसल्याने थोडे दुर्लक्ष झाले आहे.
 
 
 
या रेल्वे स्थानकावर काही वर्षांपासुन शहराच्या लगत अनधिकृत बांगलादेशी रोहिंग्यानी अतिक्रमण करुन वस्ती थाटली होती. परिणामी, हे नशेखोर रोंहीगे रेल्वेत भिक मागण्यांसाठी फुकटात रेल्वेप्रवास करण्यासाठी स्टेशनवर गर्दी करायचे. नुकतीच वनविभागाने अतिक्रमनाची कारवाई करीत यांच्या अनधिकृत वस्तीवर बुलडोझर चालवील्याने लादेन नावाने ओळखले जाणारे हे नशेखोर येथुन रफ्फुचक्कर झाले. मात्र आता येथे नवीनच प्रवाशी पाहायला मिळतात ते म्हणजे येथे माकडांचाच मुक्त वावर असतो. माकडं पुर्ण प्लांट फार्म लघवी आणि संडास करुन घाणेरडा करुन ठेवतात. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्टेशन स्वच्छ ठेवण्याची मागणी प्रवासी करीत आहे.
Powered By Sangraha 9.0