‘त्या’ विद्यार्थिनीला वसतिगृह साेडण्याचे निर्देश

30 Mar 2026 16:13:51
अनिल कांबळे
नागपूर, 
ragging case महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील चाैथ्या वर्षातील विद्यार्थिनीने तिच्या खाेलीत राहणाऱ्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची रॅगिंग केली हाेती. याप्रकरणी विद्यापीठातील अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडूत बुटीबाेरी पाेलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल केला. आता विद्यापीठ समितीद्वारे कारवाई म्हणून विद्यार्थिनीला वसतिगृह साेडण्याचे निर्देश दिले आहे.
 

ragging  
 
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात विधी अध्यासक्रमाच्या चाैथ्या वर्षात आणि दुसèया वर्षात शिकणाèया दाेन विद्यार्थिनी वसतिगृहातील एकाच खाेलाेत वास्तव्यास हाेत्या. दरम्यान दाेघीचेही एकमेकांशी पटत नसल्याने त्यांचे भांडण व्हायचे, त्यातून सिनिअर असलेल्या विद्यार्थिनीच्या विराेधात ज्युनिअर असलेल्या विद्यार्थिनीने 16 मार्चला अ‍ॅन्टी रॅगींग सेल कडे तक्रार नाेंदवली हाेती. ragging case समितीद्वारे याबाबत दाेन्ही मुलींची उलट तपासणी करण्यात आली. त्यानंतर समितीकडून सिनियर असलेल्या विद्यार्थिनीविराेधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर समितीने कारवाई म्हणून विद्यार्थिनीला वसतीगृह साेडण्याचे निर्देश दिले.
Powered By Sangraha 9.0