पाेहण्याचा माेह जीवावर बेतला

30 Mar 2026 20:50:01
- खाणीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू
 
अनिल कांबळे
नागपूर,
Youth dies due to drowning मित्रांसाेबत फिरायला गेलेल्या युवकाचा पाेहण्याचा माेह जीवावर बेतला. मित्रांसह पाण्यात पाेहताना खाेल पाण्यात गेल्यामुळे बुडून युवकाचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रशेखर पटेल (16) सिद्धीकी ले आऊट, गाेधनी अशे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

dath 
 
Youth dies due to drowning घटनेच्या वेळी आर्यन पटेल हा मित्रांसाेबत पिटेसूर येथील स्वराज फार्म समाेरील खाणीकडे िफरायला गेला हाेता. तेथे खाणीतील पाण्यात पाेहण्याचा त्याला माेह आवरला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडाला. त्याचे मित्र काठावर बसून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत हाेते. मात्र, ताे खाेल पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. अग्नीशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतुदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी गिट्टीखदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
Powered By Sangraha 9.0