34 वर्षे नीट संसार आणि म्हातारपणात साेडली पतीची साथ
31 Mar 2026 11:07:05
अनिल कांबळे
नागपूर,
family court पती नाेकरीवर असताना शहरात 34 वर्षे नीट संसार केला. मात्र, पती सेवानिवृत्त हाेताच पत्नीने खेडेगावात राहण्यास नकार दिला. शहरात राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीने पतीवर पाेटगीसह अन्य खर्च मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेसुद्धा पत्नीची याचिका खारिज केली. स्वतःहून पतीसाेबत राहण्यास नकार दिल्यामुळे पत्नीला पाेटगी मिळणार नाही, अशा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
आशिष आणि प्रगती (काल्पनिक नावे) पती-पत्नी असून त्यांना दाेन मुले आहे. आशिष हा यवतमाळ येथील जिल्हा परिषदेत लिपिक पदावर कार्यरत हाेते. त्यांचे उच्चशिक्षित असलेल्या प्रगतीसाेबत लग्न झाले. शासकीय नाेकरीवर पती असल्यामुळे प्रगतीचा स्वभाव खर्चिक झाला. ती नेहमी पैशांचा वारेमाप खर्च करीत असे. नाेकरीनिमित्त आशिष आणि प्रगती मुलांसह यवतमाळ शहरात राहत हाेते. दाेघांचा 34 वर्षे नीट संसार चालला. जून-2018 मध्ये आशिष सेवानिवृत्त झाला. कुटुंबीय आणि मित्र परिवाराला छानशी पार्टी देऊन नवीन वाटचालीसाठी आगेकूच केली. मातीशी नाळ जुळलेल्या आशिष यांना मूळ गावी जाऊन वडिलाेपार्जित घरी राहायचे हाेते. नाेकरीनिमित्त 34 वर्षांपेक्षा जास्त काळ शहरात घालविल्यामुळे आता उर्वरित आयुष्य नैसर्गिक वातावरणात घालवायचे हाेते.
उच्च न्यायालयाने फटकारले
प्रगतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. उच्च न्यायालयानेही तिला पाेटगीसाठी अपात्र ठरवले. प्रगतीने तीन दशकांच्या सहजीवन काळात आशिषच्या वागणुकीसंदर्भात कधीच तक्रार केली नाही.family court तिचे आशिषवरील सर्व गंभीर आराेप बिनबुडाचे आहेत. आशिष तिला साेबत ठेवण्यास तयार आहे. परंतु, तिलाच खेड्यात राहायचे नाही. त्यामुळे तिने काेणतेही ठाेस कारण नसताना आशिषची साेबत साेडली आहे. करिता, तिला पाेटगी दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.