शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजनाचा प्रश्‍न सोडवा

31 Mar 2026 19:26:39
गडचिरोली,
sudhakar-adabale-dadaji-bhuse : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान भवन येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन शिक्षण विभागातील विविध मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
 
 
KLK
 
 
यावेळी संचमान्यता दुरुस्ती, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन स्थगित करण्यात यावे व बीएलओची कामे न स्वीकारणार्‍या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 23 ऑगस्ट 2024 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, चंद्रपूर येथे बीएलओ म्हणून कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकाला मारहाण प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी याबाबत चर्चा करून निवेदन दिले.
 
 
तसेच 18 मार्च 2026 च्या इतिवृत्तानुसार पत्र निर्गमित करण्यात यावे व तोपर्यंत समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यावर मंत्री भुसे यांनी सचिवांशी संपर्क साधून पत्र काढण्याबाबत सूचना केल्या. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0