नागपूर,
free coaching class लोक समस्या संशोधन व लोककल्याण समिती अंतर्गत झेप यशाची निःशुल्क कोचिंग क्लासचे वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राजेश लोया, महानगर संघचालक यांनी भूषविले तर विदर्भ प्रांत प्रमुख अरविंद कुकडे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. सक्सेस पॉइंट स्कूलच्या प्रिन्सिपल किरणापुरे, नरेंद्रनगर भाग संघ चालक डॉ. वर्दळकर यांचा विशेष उपस्थिती होती. तसेच लोककल्याण समितीचे सचिव माधव उराडे ह्याही प्रसंगी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, भारत माता पूजन व सरस्वती वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लोककल्याण समितीच्या इतर कामांची माहिती पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित केली गेली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, श्लोक व नाटिका उत्साहाने सादर केली. free coaching class मागील वर्षी ८५% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महेंद्रजी सेठ, कल्याण मित्र यांच्या हस्ते रोख बक्षीसे देण्यात आली. तसेच प्रकल्प प्रमुख वीरेंद्र मल्होत्रा यांच्या हस्ते महेंद्रजी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व शिक्षकांचे विद्यार्थीांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले. प्रमुख वक्ता अरविंद कुकडे यांनी विद्यार्थ्यांना पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद ठेवण्याचे महत्त्व सांगितले आणि त्याग, समर्पण, सेवा व निस्वार्थ प्रेम यासारख्या मूल्यांचा अनुभव आपल्या आचरणातून मिळवण्यावर भर दिला. free coaching class अध्यक्ष राजेश लोया यांनी मुलांना व पालकांना समाजाशी एकरूप होण्याचे संदेश दिले आणि समाजातील सक्षम व्यक्तींनी गरजूंस मदत करावी, तसेच मातृभाषा संवादाचे माध्यम असावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन कविता राजवाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता जोशी यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा प्रकल्प प्रमुख वीरेंद्र मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ठरवली होती. कार्यक्रमात ६० हून अधिक पालक, विद्यार्थी व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. free coaching class पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशासाठी कविता राजवाडकर, छाया गावंडे, राजेश जोशी, दुबे, नीलम कावळे आणि सविता जोशी यांनी सहकार्य केले.
सौजन्य: रोशनी नवघरे, संपर्क मित्र