आवर्तनं कादंबरीचे आज प्रकाशन

31 Mar 2026 16:53:46
नागपूर,
Avartan novel गूढ आणि उत्कंठावर्धक आशयाने वाचकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी लेखिका गायत्री मुळे लिखित ‘आवर्तनं’ या कादंबरीचे प्रकाशन मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नवदृष्टी सभागृह, दीक्षाभूमी जवळ, टी.बी.आर.एस. मुंडले शाळेच्या परिसरात होणार आहे.
 
Avartan novel
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात लेखक व संपादक डॉ. शैलेश पांडे उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ लेखिका व कादंबरीकार डॉ. भारती सुवर्णे मार्गदर्शन करणार आहेत. Avartan novel तसेच भाष्यकार म्हणून डॉ. विनिता हिंगे या उपस्थित राहतील. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्षा  शिवानी वाणी बवरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
 
कार्यक्रमाची सुरुवात शारदा स्तवनाने होणार असून, सूत्रसंचालन सन्मती अडावकर करतील, तर आभार प्रदर्शन कुणाल पितळे करतील. ‘आवर्तनं’ ही कादंबरी मानवी मनाच्या गूढ प्रवासाचे तसेच आयुष्याच्या वळणांवरील अनपेक्षित सत्यांचे प्रभावी चित्रण करणारी आहे. Avartan novel या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: रश्मी मदनकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0