मोफत सिलिंडर, मोफत पाणी आणि महिला-ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹३,०००

31 Mar 2026 21:51:48
तिरुवनंतपुरम
bjp-releases-manifesto : केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा जाहीर करत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली आहेत. या जाहीरनाम्यात सामाजिक कल्याण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक मदतीवर विशेष भर देण्यात आला आहे.
 
 
bjp-releases-manifesto
 
मिळालेल्या माहितीनुसार, सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना दरवर्षी दोन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेषतः ओणम आणि ख्रिसमससारख्या सणांच्या वेळी हे सिलिंडर देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
 
तसेच प्रत्येक कुटुंबाला ठराविक प्रमाणात मोफत पाणी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. यासोबतच गरजू महिलांसाठी दरमहा आर्थिक मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन आणि इतर सामाजिक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
 
 
भाजपने राज्यात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प, आरोग्य क्षेत्रात मोठे गुंतवणूक प्रकल्प तसेच विविध विकास योजना राबवण्याचेही आश्वासन दिले आहे.
 
या जाहीरनाम्याद्वारे भाजपने केरळमधील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असून, आगामी निवडणुकीत याचा किती परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0