- गोंदियातील रक्तमित्रांची तत्परता
गोंदिया,
'Blood donation is the greatest gift' ‘रक्तदान हेच महादान’ या उक्तीला साजेसं कार्य करत गोंदिया येथील जागरूक रक्तदाते आणि डॉक्टरांनी पुन्हा एकदा मानवतेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे. शहरातील डॉ. संजय देशमुख यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या एका दिवसाच्या नवजात बालिकेसाठी दुर्मिळ ‘ओ-नेगेटिव्ह’ रक्ताची तातडीने उपलब्धता करून देत तिचे प्राण वाचविण्यात आले आहे.
'Blood donation is the greatest gift' गोंदिया येथील सोनाली हरिणखेडे यांनी अलीकडेच एका बालिकेला जन्म दिला. जन्मानंतर बालिकेची प्रकृती अचानक खालावल्याने तिला तात्काळ डॉ. संजय देशमुख यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत बालिकेच्या शरीरात रक्ताची मोठी कमतरता असल्याचे आढळून आले आणि तिला त्वरित ‘एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन’ (रक्त बदलणे) करण्याची गरज होती. मात्र बालिकेचा रक्तगट ‘ओ-नेगेटिव्ह’ असल्याने तो अत्यंत दुर्मिळ असून आपत्कालीन परिस्थितीत मिळवणे कठीण होते. रक्तमित्रांची तत्परता आणि समन्वय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. देशमुख यांनी तात्काळ गोंदिया येथील ‘रक्तमित्र’ विनोद चांदवानी यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच गुड्डू चांदवानी यांनी त्यांच्या सक्रिय रक्तदाता यादीतून त्वरित शोध घेऊन शहरातील नियमित रक्तदाता प्रकाश शिवदासानी यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, एक दिवसाच्या बालिकेची गंभीर अवस्था समजताच प्रकाश शिवदासानी यांनी कोणताही विलंब न करता लोकमान्य रक्तपेढीत जाऊन आपले दुर्मिळ ‘ओ-नेगेटिव्ह’ रक्तदान केले. त्यांच्या या तत्परतेमुळे वेळेत ‘एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन’ होऊ शकले आणि बालिकेचा जीव वाचविण्यात यश आले. या निस्वार्थ सेवेबद्दल प्रकाश शिवदासानी यांचा रक्तमित्र विनोद चांदवानी, नितीन रायकरवार आणि नितीन पंधरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हरिणखेड़े कुटुंबीयांनी रक्तदाता प्रकाश शिवदासानी, गुड्डू चांदवानी तसेच डॉ. संजय देशमुख यांचे आभार मानले.