एक महिन्यापासून फलाटावर रात्री अंधार

31 Mar 2026 19:34:42
सिंदी (रेल्वे), 
platform-of-the-local-railway-station : स्थानिक रेल्वे स्थानकाच्या फलाट २ वर दररोज रात्रीच्या वेळीच नेमका अंधार असतो. याबाबत स्थानक प्रबंधकाला विचारणा केली असता ते समर्पक उत्तर देऊ शकले नाही.
 
 
JK
 
 
कोरोना काळापासून येथील रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचा आरोप विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाने केला आहे. शालीमार एसप्रेसच्या दोन्ही दिशेचे थांबे अद्याप पूर्ववत सुरू झाले नाही. अगदी आमदार, खासदारांच्या विनंतीला सुद्धा केराची टोपली दाखवली जात आहे. मागील एक महिन्यापासून फलाट २ वर रात्री जबलपूर एसप्रेस ७ वाजता पोहचते. नेमके त्याचवेळी फलाटावर अंधार असतो. पहाटे दादर (सेवाग्राम) एसप्रेस या स्थानकावर आली की सर्वत्र अंधार दिसतो. त्याचा त्रास वृद्ध प्रवाशांना होत असून, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का, असा सवाल प्रवासी मंडळाचे सदस्य उमेश बांगडे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईवरून आलेल्या वृद्ध दाम्पत्याला रामनवमीच्या दिवशी दिवस उजाडण्याची वाट बघावी लागली होती, हे विशेष. नागपूरस्थित विभागीय रेल व्यवस्थापकांनी या गंभीर प्रकरणी तातडीने लक्ष पुरवावे, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0