लेकीच्या रूपाने मिळाली नवसंजीवनी

31 Mar 2026 19:30:48
मुंबई  
MLA Vijay Shivtare बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याची एक हृदयस्पर्शी घटना समोर आली असून, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान केली आहे. गेल्या काही काळापासून विजय शिवतारे हे किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर होते आणि त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अशा कठीण प्रसंगी पित्याला नवजीवन देण्यासाठी त्यांच्या कन्या ममता शिवतारे देवदूत ठरल्या. या शस्त्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या बाप-लेकीच्या अतूट प्रेमाची, कर्तव्याची आणि त्यागाची चर्चा होत आहे. केवळ मुलगा घरचा वंशाचा दिवा नसून मुलगीही वंश सांभाळणारी आणि वंश फुलवणारी पणती असते, हेच या घटनेतून सिद्ध होत आहे.
 
mla shivtare 
MLA Vijay Shivtare विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ’किडनी ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. ममता शिवतारे यांनी केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक मुलगी म्हणूनही आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा केली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या वडील आणि मुलगी दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. एका पित्याच्या हातातली आधार देणारी काठी बनलेली मुलगी पुरंदर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
विजय शिवतारे यांची राजकीय कारकीर्द
MLA Vijay Shivtare विजय शिवतारे, ज्यांना त्यांचे समर्थक प्रेमाने ’बापू’ म्हणतात, हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. जरी त्यांना २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, तरी २०२४  च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यापूर्वी त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्या जनसंपर्कामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
MLA Vijay Shivtare समाजात अनेकदा मुलाला प्राधान्य दिले जात असताना, ममता शिवतारे यांनी केलेल्या या कृत्याने लेकीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ‘देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणूनच तो लेकीच्या रूपाने आपला दूत पाठवतो,‘ अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय कारकीर्दीत अडथळे येत असताना, आता मुलीने दिलेल्या या ’गिफ्ट’मुळे विजय शिवतारे पुन्हा एकदा नव्या जोमाने जनसेवेत सक्रिय होतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
 
Powered By Sangraha 9.0