विदर्भ भारत विकास परिषद अध्यक्षपदी दिलीप गुळकरी

31 Mar 2026 11:36:33
नागपूर,
Vidarbha Bharat Vikas Parishad भारत विकास परिषद, विदर्भ प्रांताची २०२६-२७ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी दिलीप गुळकरी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महासचिवपदी सौ. आसावरी दिलीप वरकड आणि कोषाध्यक्षपदी ए. राहुल बजाज यांची निवड झाली आहे.
 
Vidarbha Bharat Vikas Parishad
 
‘स्वस्थ, समर्थ व संस्कारित भारत’ या उद्देशाने भारत विकास परिषद २०१४ पासून विदर्भ प्रांतात कार्यरत असून, देशभक्ती, राष्ट्रीय एकता व अखंडतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. Vidarbha Bharat Vikas Parishad सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत विविध उपक्रम राबवून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचे कार्य परिषद करत आहे. संस्थेची धोरणे आणि कार्यक्रम राबवताना ‘संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण’ या तत्त्वांचा अवलंब सर्व पदाधिकारी आणि सदस्यांकडून सातत्याने केला जात आहे. याशिवाय, पश्चिम क्षेत्राच्या महिला सहभागिता समन्वयकपदी सीमा मुनशी यांची २०२६-२७ या कालावधीसाठी फेरनिवड करण्यात आली आहे.
सौजन्य: सीमा मुंशी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0