जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पालकमंत्री भोयर यांचा बुस्टर डोज,

31 Mar 2026 22:41:55
11816 शेतक-यांना मिळणार 2017 च्या कर्ज माफीचा लाभ

वर्धा.
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या लाभा पासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील 11816 शेतक-यांना Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकार ने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेसाठी 60.34 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. तसा शासन आदेश 31 मार्च रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे.
 
 
bkhoy
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र सदर योजनेपासून वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून कर्ज घेतलेले शेतकरी वंचित होते. या शेतक-यांना देखील कर्ज माफीचा लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासन स्तरावर प्रयत्न आरंभिले होते.जिल्हा सहकारी बॅंकेतून 11816 शेतक-यांनी 60.34 कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु शासनाच्या कर्ज माफी योजनेत समावेश नसल्याने सदर शेतकरी लाभापासून वंचित होते. परिणामी या शेतक-यांना अन्य बॅंकेतून कर्ज मिळणे देखील कठीण झाले होते. तसेच अनेक कर्जधारक शेतक-यांचा मृत्यू झाल्याने त्यांना देखील कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता.
जिल्हा बॅकेसाठी डॉ. भोयर यांना पाठपुरावा
Dr. Pankaj Bhoyar  वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक तत्कालीन व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे आर्थिक डबघाईस आली होती. त्यामुळे रिजर्व बॅंकेने सहकारी बॅंकेचा परवाना देखील रद्द केला होता. आ. डॉ. पंकज भोयर यांनी राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकेला अर्थ सहाय करून बॅकेला परवाना प्राप्त करून दिला होता. दरमियान डॉ. पंकज भोयर यांनी सतत बॅकेची आर्थिक स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केल्याने आज बॅक आर्थिदृष्टया सक्षम होत आहे. मागील वर्षी बॅकेने शेतक-यांना कृषि कर्ज देण्यास प्रारंभ केला आहे.
सहकारी बॅक होणार सक्षम
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला 60.34 कोटी रूपये कज्र माफी अंतर्गत प्राप्त होणार असल्याने बॅक आणखी सक्षम होणार आहे. तथापि, यावर्षी बॅंकेचे कृषि कर्ज वाटपाचे उददिष्ट देखील वाढणार आहे. कर्ज माफी योजनेतंर्गत 1 लाख 50 हजार पर्यंत कर्ज असलेले 11081 शेतकरी व ओटीएस अंतर्गत 1 लाख 50 हजारांपेक्षा अधिक कर्ज असलेले 735 शेतकरी पात्र ठरणार आहे. 11081 शेतक-यांसाठी 51 कोटी 28 लक्ष 90 हजार तर 735 शेतक-यांसाठी 9 कोटी 5 लक्ष 7 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मोठा प्रश्न सोडविला
जिल्हयातील जवळपास 12 हजार शेतकरी शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कृषी कर्ज लाभापासून वंचित होते. या शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे. कर्ज माफी योजनेच्या पैशामुळे बॅके पुर्नजीवित होण्यास मोठी मदत होणार आहे.जिल्हा सहकारी बॅकेची आर्थिक घडी सक्षम होऊन ज्यांची रक्कम बॅकेत अडकली आहे. त्या खातेदारांना देखील टप्प्या टप्प्याने रक्कम परत देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
अॅड. सुधीर कोठारी – सभापती कृउबास हिंगणघाट
Powered By Sangraha 9.0