वेध
चंद्रकांत लोहाणा
farmer trapped financial cycle भारतीय अर्थव्यवस्था जवळपास 80 टक्के कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकरी हाच देशाचा आर्थिक कणा समजला जातो. नव्हे तो आहेच. तरीही तो परावलंबी आणि दलालाच्या हातचे खेळणे बनल्याने समाजामध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. हा संपूर्ण बाजार दलालांनी पोखरून काढल्याने शेतकèयांची हतबलता शिगेला पोहोचली आहे. देशामध्ये सर्वच उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे दर ठरविण्याचे अधिकार उत्पादकांना आहे. मात्र, आपल्या रक्ताचे पाणी करून आणि उघड्या आकाशाखाली घाम गाळून उत्पादित केलेल्या धान्याचे भाव दलालांनी ठरवायचे अन् त्यावर आकारणीही करायची, अशी संघटित आर्थिक लूट स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही सुरूच आहे. ज्याचा माल, त्याचे दाम तोच ठरविणार हे एक नैसर्गिक सूत्र आहे. परवडणारा घेईल अन्यथा तो दुसरा रस्ता शोधेल, असा साधारणत: एक नियम असतो. परंतु, या नियमाला शेतकरीच अपवाद ठरला आहे. त्यामुळे शेतकरी जरी देशाचा अन्नदाता असला तरी या देशामध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाèया शासकांनी त्यास याचक बनवून ठेवले आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरी आणि शेतमजुरांचे आर्थिक चक्रही पूर्णतः शेतीवरच अवलंबून राहत आले आहे. शेतकèयांच्या पिढ्यान्पिढ्या त्यामध्ये खपल्या. त्यामुळे पुढची तजवीज म्हणून मिळेल त्या भावाने आपला माल विकण्यास शेतकरी बाध्य झालेला असतो. ग्रामीण भागामध्ये अजूनही आर्थिक सेवांची अतिशय कमतरता आहे. त्यामुळे शेतकèयांच्या आपत्कालीन गरजाही कधीच परिपूर्ण होत नाही. त्यासाठी त्यांना दारोदार भटकावे लागते. अशा बिकट परिस्थतीमध्ये मिळेल त्या भावामध्ये आपला माल विकावा लागतो. कारण, मागणारा अथवा समोर मुलीचे लग्न, वैद्यकीय यासारखा मोठा खर्च आ वासून तोंडासमोर उभा असतो. अशावेळी सर्व पर्याय बंद असतात. कारखानदार आपल्या फायद्यावर ठाम असतो. तो सर्व गोळाबेरीज करूनच व्यवसाय करीत असतो. याउलट शेतकèयाला हेही कळत नाही की, त्याचा माल अंतिम खरेदीदाराला कोणत्या भावामध्ये विकला जातो. कारण, यावर त्याचे कोणतेच नियंत्रण नसते. कृषी बाजारपेठेमध्ये निर्माण झालेली मध्यस्थ व दलालांची लांब साखळी, एवढी साखळी प्रयत्न करूनही कोठेच सापडणार नाही. हीच संघटित साखळीच शेतकèयांसाठी सदैव मारक ठरत आली आहे. या आधुनिक युगामध्ये कार्पोरेट क्षेत्र तर शेतकèयांच्या मुळावरच उठले आहे. मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे शेती हा व्यवसाय प्रचंड तोट्यामध्ये आला असून, निसर्गाचे हे बदलते चक्र दुष्काळामध्ये तेराव्या महिन्यासारखे ठरत आहे. पाऊस कसा आणि कधी पडेल याचा नेम नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने निसर्गचक्रही आपला रंग दाखवीत आहे. हे वास्तव दिवसेंदिवस अधिक गडद होणार आहे. त्यामुळे शेतामधील उभी पिके कधी शेतामध्येच सडतात, तर कधी पाण्याअभावी सुकूनही जातात. पीक हाती आलं की, त्याचे भाव खाली आलेले. या दृष्टचक्रामधून शेतकèयाने बाहेर पडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो बाहेर पडूच शकत नाही. उलट त्या चक्रात तो अधिक फसत जातो. हे एक भयाण वास्तव आहे. त्यामुळे निसर्ग आणि दलाल अशा दुहेरी चक्रामध्ये अडकलेल्या शेतकèयांच्या हाती हतबलतेशिवाय काहीच येत नाही.
आता पूर्वीसारखी शेतीही परवडणारी राहिली नाही. दरवर्षी वाढणारा लागवडीचा खर्च, खताचे वाढते दर त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च अतिशय वाढला आहे. कधी कांदा, कधी पालेभाज्या, कधी टोमॅटो तर कधी निसर्गाच्या धक्क्यानेही शेतकरी सदैव अडकित्त्यामध्ये सुपारीसारखा अडकलेला असतो. वर्षभर ही मालिका सुरू राहत असल्याने आज शेतकरी अधिक भरडला जात आहे. काँग्रेसने वाèयावर सोडलेल्या शेतकèयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधकांना तो पचनी पडला नाही. नरेंद्र मोदी यांच्या द्वेषापायी विरोधकांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे आशेचा एक जो किरण दृष्टिपथास आला होता, तोही विरोधकांच्या आक्रास्ताळपणामुळे धूसर होताना दिसत आहे. शरद पवार कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील शेतकèयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.farmer trapped financial cycle परंतु, तेव्हाही शेतकèयांच्या हाती फक्त निराशाच आली. केंद्रात रालोआ सरकार आल्यानंतर शेतकèयांचे दु:ख जाणून त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. नुकताच महाराष्ट्रातील शेतकèयांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा करण्यात आला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकèयांच्या खात्यात दोन योजनांमधून 90 लाख शेतकèयांच्या खात्यात 54 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे सर्व असूनही दलाल, व्यापारी यांच्या साखळीतून शेतकèयांची सुटका होणे आवश्यक आहे.
9881717856