औषधांच्या तुटवड्याचा परिणाम रुग्णांच्या आराेग्यावर

31 Mar 2026 11:01:13
अनिल कांबळे
नागपूर,
drug shortages प्रादेशिक मनाेरुग्णालयात औषधांच्या तुटवड्याचा फटका रुग्णांच्या आराेग्यावर पडत आहे. औषधांचा अभाव म्हणजे रुग्णांच्या जीवाशी धाेकादायक ठरु शकते, त्यामुळे मुलबक औषधसाठा ठेवणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे, अशा शब्दात न्यायालयाने प्रशासनाला फटकारले. काही वेळानंतर प्रशासनाने औषधी उपलब्ध असल्याचा दावा केल्यावर याची पडताळणी करण्याचे निर्देश न्यायालयाने न्यायालयीन मित्राला दिले.
 
 
 
drug shortages
 
 
प्रादेशिक मनाेरुग्णालयात आवश्यक औषधांचा तुटवडा, मूलभूत सुविधांचा अभाव, रिक्त पदे यावर चिंता व्यक्त करत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर साेमवारी न्या. अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, न्यायालयीन मित्र अ‍ॅड. ईशा ठाकरे यांनी रुग्णालयातील बिकट स्थितीबाबत माहिती दिली. मनाेरुग्णालयात आवश्यक औषधांची खरेदी हाेत नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागताे. याबाबत जबाब देण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त वेळ मागितला. प्रशासनाच्या या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. औषध पुरवठा करण्याऐवजी तुम्ही वेळ मागत आहात. औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल हाेत आहेत, अशा शब्दात न्यायालयाने प्रशासनाला फटकारले. न्यायालयाने प्रशासनाला लगेच माहिती घेण्याचे निर्देश दिले.drug shortages प्रशासनाने आवश्यक औषधांची खरेदी केली गेली असल्याचा दावा केला. या दाव्याची पडताळणी करण्याचे निर्देश न्यायालयाने अ‍ॅड. ठाकरे यांना दिले. दरम्यान, औषधांच्या खरेदीत तांत्रिक अडचणी येत असल्याचा मुद्दा प्रशासनाने मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने रुग्णांची चिंता असल्याचे मत व्यक्त करत हा मुद्दा तुम्हीच साेडवा, असे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 8 एप्रिल राेजी हाेणार आहे.

Powered By Sangraha 9.0