अंबानगर मंडळाची प्रेरणादायी सहल

31 Mar 2026 11:56:57
नागपूर,
Ambanagar Mandal माँ अंबा जेष्ठ नागरिक मंडळ अंबानगर (आराधना नगर), दिघोरी, नागपुर यांच्या वतीने हेमलकसा–भामरागड व आलापल्ली, मार्कंडेश्वर मंदिर अशी दोन दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीस मंडळातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहली दरम्यान निसर्गाच्या कुशीत विहंगम दृश्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. पर्लकोटा, गौतम आणि ईदरावती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर सर्व सदस्यांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच निसर्गरम्य परिसरातील सुंदर सूर्यास्ताचे दृश्य कॅमेरात टिपले गेले, ज्यामुळे सहलीच्या आठवणी अधिक जिवंत राहिल्या.
 
Ambanagar Mandal
 
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्याशी संवाद साधण्याची व मुलाखत घेण्याची सुवर्णसंधी मंडळाला लाभली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती सर्व सदस्यांना भारावून टाकणारी ठरली. Ambanagar Mandal यानंतर प्राणी संग्रहालयाला भेट देऊन विविध प्राण्यांविषयी त्यांनी स्वतः माहिती दिली, जो अनुभव सदस्यांसाठी खास ठरला. डॉ. आमटे यांनी सर्व सदस्यांशी मनसोक्त संवाद साधला आणि प्रत्येकाला जीवनाचे ध्येय ठरवून मेहनत करण्याची प्रेरणा दिली.
 
सहलीत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचा आनंद घेत, मंडळाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ही सहल राजारामजी डोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळाचे सचिव सागर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. Ambanagar Mandal सहलीच्या आयोजनात डोनारकर, मधुकर आबिलदुके, दादाराव झंझाड, नाना चांदपूरकर, ज्ञानेश्वर ढोबळे, चंद्रशेखर रहाटे, रामप्रसाद अमृते, वासुदेव श्रीरामे, गंगाधर गाडबैल व प्रभाकर पिल्लारे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
सौजन्य: सतीश देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0