देवळीत महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगल्या दमदार लढती

31 Mar 2026 22:45:10
देवळी.
Maharashtra Kesari Wrestling in Deoli ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी किताब व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 31 मार्च ला संध्याकाळी 5पासून सुरुवात झाली असून 130 किलो वजन गटातील महाराष्ट्र केसरी गटाची लढत आमदार समीर कुणावर, स्वागताध्यक्ष आमदार राजेश बकाने, आयोजक व माजी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, हिंदकेसरी योगेश दोडके यांनी प्रेक्षणीय कुस्तीची लढत लावून सुरुवात केली.
 

kust 
 
महाराष्ट्र केसरी करिता
Maharashtra Kesari Wrestling in Deoli  तीन लढती झाल्या या मध्ये दिग्विजय भोंडवे पुणे जिल्हा, रवींद्र शेळके रायगड जिल्हा यात भोंडवे विजयी, कार्तिक गवळी नासिक लढत ऋषिकेश बोमने लातूर यात ऋषिकेश बोमने विजयी, वर्धमान लसडा कोल्हापूर जिल्हा, संभाजी कदम बीड वर्धमान लसडा विजयी, करण महाले वासिम मात उदय लोंढे सांगली विजयी 97 किलो वजन गटात आदित्य मोहोळ पुणे शहर मात पृथ्वीराज पडघम धाराशिव विजयी, सोलापूर सुरज मगर सोलापूर मात सिद्धांत रबळे पुणे विजयी. 82 किलो वजन गटामध्ये संतोष कांबळे अकोला मात श्रीकृष्ण जाधव लातूर विजयी. 72 किलो वजन गटात मिराज असलम बेग मात रायबाज खान चंद्रपूर विजयी, गोविंद बारा पात्रे लातूर मात सौरभ काळे सातारा विजयी इत्यादी लढती प्रेक्षणीय ठरल्या असून या लढती पाहण्याकरिता देवळे शहर व परिसरातील कुस्तीप्रेमीची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0