पिंपळगावच्या श्री दत्त मंदिरासाठी 50 लाखांचा निधी

31 Mar 2026 20:13:51
आ. बाबुराव कदम यांच्या प्रयत्नांना यश

हदगाव, 
Pimpalgaon Shree Dutt Temple पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर संस्थान हे ब दर्जाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, रामनवमी यात्रेनिमित्त आयोजित भव्य-दिव्य सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्याचे पर्यटन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी 50 लाखांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे. या निधी मंजुरीसाठी आमदार बाबुराव कदम यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. या निधीमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होणार आहे.
 
 
datta
 
Pimpalgaon Shree Dutt Temple  या मंजुरीबाबतचे अधिकृत पत्र व्यंकटस्वामी महाराज यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तगणांना निधीचा वापर, विकास कामांची रूपरेषा व आगामी नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी परिसरातील संत-महंत, पंचक्रोशीतील पदाधिकारी, विविध संस्थांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. मंजूर निधीमुळे रामनवमी उत्सव अधिक भव्य, आकर्षक व सुव्यवस्थित पद्धतीने साजरा झाला असून मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, निवास व्यवस्था आदी कामांना गती मिळणार आहे. या निधीमुळे पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर संस्थानाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार असून भविष्यात हे तीर्थक्षेत्र अधिक सुसज्ज व प्रसिद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0