परसबाग स्पर्धेत जळगावची न्यू इरा जिल्ह्यात अव्वल शाळेला मिळणार १५ हजारांचे बक्षीस

31 Mar 2026 21:58:37
सिंदखेड लपाली येथील श्री शिवाजी विद्यालय द्वितीय 
बुलढाणा, 
PM Poshan Shakti Nirman Yojana प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धा विजेत्या शाळेचे नावे शिक्षण विभागार्फत घोषित करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जामोदने प्रथम, मोताळा द्वितीय तर बुलडाणा तालुका तृतीय क्रमांकावर आला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. खरात यांनी हे निकाल जाहीर केले असून जळगाव जामोद तालुक्यातील न्यू इरा प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक, मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील श्री शिवाजी विद्यालय द्वितीय तर बुलडाणा लुक्यातील चांडोळ येथील जि.प. उर्दू प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शाळेत शिकणार्‍या शिक्षकांना आता अध्यापना सोबतच शाळेच्या परिसरात शेती पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
 
 
pars bag
 
PM Poshan Shakti Nirman Yojana शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथील भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जावा या उदात्त हेतूने शासनाने राज्यभरातील शाळांसाठी २०२४ या वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग स्पर्धा घोषित केली होती. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात व्हावा, विद्यार्थ्यांना पोष्टिक आहार उपलब्ध व्यवा हा या स्पर्धे मागील उद्देश आहे.शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्कृष्ट परसबागेला बक्षीसे दिले जातात. या स्पर्धेतंर्गत जिल्हास्तरावर प्रथम येणार्‍या शाळेला १५ हजार, द्वितीय पुरस्कारासाठी ११ हजार आणि तृतीय पुरस्कारासाठी ७हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक येणार्‍या शाळेला ७ हजार ५०० द्वितोप क्रमांकाला ५ हजार आणि तृतीप क्रमांकाला ३ हजार रुपये व प्रोत्साहन म्हणून तीन शाळांना प्रत्येकी २ हजार अशी प्रोत्साहनपर बक्षीसे दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी शंभर गुणांचे निकष ठेवण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0