नेर,
Prashant Bunde Idol Teacher महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेमार्फत राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक म्हणून नेरपरसोपंत येथील दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रशांत बुंदे यांची निवड करण्यात आली. शिक्षकांच्या अनुभव आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करून देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्य करणाèया शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड केल्या जाते.
Prashant Bunde Idol Teacher या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करता यावा यासाठी व उत्तम दर्जाच्या शिक्षकांची बँक तयार करण्यासाठी राज्यामध्ये आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी राज्यभरातून 332 नामांकने प्राप्त झाली होती. यामध्ये एकूण 42 शिक्षक आयडॉल शिक्षक म्हणून पात्र ठरले. यात यवतमाळ जिल्ह्यातून प्रा. प्रशांत बुंदे यांना आयडॉल शिक्षक बहुमान मिळाला आहे. या आयडॉल शिक्षकांची तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणाèया विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. यासोबतच शिक्षण परिषदांमध्ये नाविन्यपूर्ण विशेष कार्याचा प्रचार-प्रसार करून त्यांना उद्बोधनही करायचे आहे. प्रशांत बुंदे यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे प्राचार्य गजानन उईके, उपप्राचार्य किशोर राठोड, पर्यवेक्षक किरण मन्नेवार, शिक्षण निरीक्षक प्रा. अरुण नरवडे यांनी अभिनंदन केले आहे.