मुंबई,
Salman announces new film बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एका मोठ्या चित्रपटावर काम करण्यास सज्ज झाला आहे. भाईजान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित युद्धपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’मुळे चर्चेत आहे, तर आता त्याने आणखी एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हा चित्रपट एक अॅक्शन-थ्रिलर असून, त्याचे दिग्दर्शन वामशी पैडीपल्ली करणार आहेत. सलमानने वामशीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाची माहिती दिली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु त्याच्या चित्रीकरणाची सुरुवात एप्रिल २०२६ मध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.