स्वयंसिद्धा प्रकल्पात प्रमाणपत्र वितरण

31 Mar 2026 12:52:50
नागपूर ,
Swayamsiddha Project रा. स्व. संघ, लोककल्याण समितीच्या “स्वयंसिद्धा” प्रकल्पांतर्गत जानेवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या शिलाई प्रशिक्षण केंद्र व सौंदर्य प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थी मुलींचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वैशालीनगर सेवा वस्तीत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने करण्यात आली.
 
 

nun 
 
 
प्रमुख पाहुण्या . वृषाली वैद्य व . नंदिनी पैठणकर यांनी मुलींना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणानंतर ज्ञान अधिक विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले.Swayamsiddha Projec तसेच या कौशल्यांचा भविष्यात रोजगार व स्वावलंबनाच्या संधी म्हणून कसा उपयोग करता येईल, याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला नागपूर महानगर स्वयंसिद्धा प्रमुख सौ. वृषालीताई वैद्य, स्वयंसिद्धा टोळी सदस्य सौ. नंदिनी पैठणकर, अजनी भाग सहसेवा प्रमुख श्री पद्माकरजी साठे, भाग संयोजिका रतिका काशीमकर, सहसंयोजिका अपूर्वा ठेमदेव, शिलाई वर्ग शिक्षिका . विशाखा पांडे तसेच सौंदर्य प्रशिक्षण शिक्षिका . भावना ठाकूर उपस्थित होते.यावेळी मुलींनी शिलाई वर्गात शिकलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडले होते. त्यांच्या कलागुणांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
सौजन्य:रितिका काशीमकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0