अवकाळी पावसामुळे बाजार समितीतील धान्य भिजले

31 Mar 2026 21:15:30
वर्धा, 
unseasonal-rains : हवामान विभागाने जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत सोमवार ३० मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस कोसळला. यात वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य भिजले.
 
 
k
 
सोमवारी रात्री ९ वाजता अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी अवकाळी पाऊस सुरू झाला. पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेले धान्य मोठ्या प्रमाणात भिजले. त्यामुळे शेतकरी व व्यापार्‍यांचे नुकसान झाले. सध्या बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी केला जात आहे. शेतकरीही गहू, हरभरा व तूर घेऊन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहेत. अशातच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पोत्यातील व उघड्यावर ठेवलेले धान्य पूर्णपणे भिजले. यात व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0