वर्धा जिल्ह्यातील १९७ ग्रामपंचायती टीबीमुक्त

31 Mar 2026 18:17:55
वर्धा, 
wardha-gram-panchayat-tb-free : जिल्हा क्षयरोग मुत करण्यासाठी क्षयरोगमुत ग्रामपंचायत अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करून पात्र ठरलेल्या १९७ ग्रामपंचायती क्षयरोगमुत करण्यात आलेल्या आहे. या क्षयरोगमुत झालेल्या ग्रामपंचायतींचा मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते महात्मा गांधी यांची प्रतिमा व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
 
TB FREE
 
 
 
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चारूलता सूर्यवंशी, डॉ. सुवर्णा यांची उपस्थिती होती.
 
 
निश्चयमित्र, आशा सेविका व सामूदायिक आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायती क्षयरोगमुत प्रोत्साहित करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल पराग सोमण यांनी क्षयरोग विभागाचे आभार मानले. पंतप्रधान यांच्या क्षयरोगमुत भारत करण्याच्या संकल्पनेनुसार वर्धा जिल्हा टीबीमुत करण्याकरिता सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी पुढाकार घेऊन काम करावे, जेणेकरून वर्धा जिल्हा टीबीमुत करण्यास मदत होईल, असे आवाहन डॉ. स्वप्नील बेले यांनी केले.
 
 
या उपक्रमांतर्गत १९७ ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. यामधील ६ ग्रामपंचायती तिसर्‍या वर्षी टिबीमुत राहिल्याबद्दल सुर्वण प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच निश्चय मित्र व नायरा एनर्जी यांनी ७९२ क्षयरुग्ण दत्तक घेतल्या बद्दल व दीपक खोब्रागडे यांनी १० क्षयरुग्ण दत्तक घेतल्याबद्दल त्यांचाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
 
 
जिल्ह्यातील क्षयरोगमुत झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आर्वी तालुयातील ३७, आष्टी ८, देवळी २६, हिंगणघाट ३४, कारंजा २२, समुद्रपूर २३, सेलू १४ व वर्धा तालुयातील ३३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. प्रास्ताविक डॉ. वाडीभस्मे यांनी तर आभार सुमंत ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ६ ग्रामपंचायतींचे सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, सामूदायिक आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कर्मचारी नन्नावरे, चंद्रे, बाखडे, सारडे, सोनटके, पुनवटकर, जगताप, अख्तर शेख यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0