भरदुपारी लाल्याचा तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला

04 Mar 2026 20:08:49
वर्धा,
assault-with-a-knife : वर्धेवरून सावंगी मेघेच्या दिशेने जाणार्‍या तिघांच्या दुचाकीला मागून आलेल्या लाल्या उर्फ लाला यादव याने कट मारला. दुचाकीला कट का मारला याबाबतचा जाब विचारला असता लाल्याने चाकू काढून तिघांवरही वार करीत जखमी केले. ही घटना भरदिवसा दयालनगर, एसबीआय एटीएम समोरील सावंगी मार्गावर ३ रोजी ४ वाजताच्या सुमारास घडली. आतिष महाकाळकर (३४), मंगेश महाकाळकर (३१) आणि आतिष बल्लाळ (३०) सर्व रा. स्टेशनफैल असे जखमी झाले.
 
 
 
kl
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आतिष, मंगेश महाकाळकर आणि आतिष बल्लाळ हे तिघेजण सावंगी मेघेकडे दुचाकीने जात होते. त्यांच्याच मागे लाल्या उर्फ लाला यादव हा सुद्धा दुचाकीने येत असताना त्याने तिघांच्या दुचाकीला कट मारून तो पुढे निघाला. आमच्या दुचाकीला कट का मारला, असा जाब लाल्याला विचारला असता लाल्याने दुचाकी थांबवून वाद घातला. हा वाद विकोपाला जात लाल्याने चाकू काढून तिघांवर वार केले. यात आतिष महाकाळकर गंभीर जखमी तर मंगेश महाकाळकर आणि आतिष बल्लाळ हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून चौकशी केली. बुधवारी पोलिसांनी जखमींचे बयाण नोंदविले. लाल्या यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे एक तर डिबीचे ३ असे ४ पथकं रवाना झाली असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
Powered By Sangraha 9.0