१२ आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

04 Mar 2026 20:15:28
वर्धा, 
sand-businessman-murder-case : वरोरा तालुयातील बामर्डा वाळू घाटावर वर्धा येथील वाळू व्यावसायिकासह त्यांच्या पार्टनरवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. पोलिसांनी तत्काळ सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे आणि अतुल मोटघरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ९ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसर्‍या दिवशी पुरुषोत्तम मोटघरे, प्रवीण वासेकर, प्रकाश कासारे आणि वाळू घाट मालक गीतेश सातपुते यांनाही त्याच दिवशी अटक करून ३ तारखेला न्यायालयात हजर करण्यात आले. वर्धा येथील अक्षय खडसे, नितीन कामडी, सौरभ ठाकूर, उदय वांदिले आणि अमोल कामडी यांना ४ रोजी न्यायालयात हजर करून ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
 
jk
 
थकबाकीच्या वादातून वरोरा तालुयातील बामर्डा येथील वर्धा नदीच्या वाळूघाटावर भरत नागपाल यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवार १ रोजी उघडकीस आली. वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून १२ आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी व तपास आयपीएस अधिकार्‍यांकडे द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
 
हिंगणघाटचे रहिवासी पंकज वानखेडे (३९) आणि त्यांच्या भागीदारांनी बामर्डा येथील वाळूघाट सरकारी लिलावाद्वारे २.५ कोटी रुपयात गीतेश सातपुते यांच्याकडून खरेदी केला. ही रकम मे २०२५ मध्ये बँक खात्यात जमा करण्यात आली. घाटाचा करार ९ जून २०२६ पर्यंत वैध होता, परंतु २५ जानेवारी २०२६ रोजी सातपुते यांनी घाट परत घेतला आणि उर्वरित ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत करण्याचे मान्य केले. अंतिम मुदतीनंतरही परतफेड न मिळाल्याने, तक्रारदार आणि त्यांचे सहकारी रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास बामर्डा घाटावर पोहोचले. त्यावेळी घाटावर वाळू उपस्याचे काम सुरू होते. सायंकाळी ६.५५ वाजता रस्त्याच्या पलीकडे दोन पोकलेन मशीन लावून मार्ग रोखून धरण्यात आला.
 
 
त्यानंतर आरोपी अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकूर, सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे, अतुल मोटघरे आणि इतर तीन ते चार जणांनी तलवारी, लाकडी काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. सौरभ ठाकूर याने भरत नागपाल यांच्यावर तलवारीने हल्ला करून नदीत फेकून दिले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच सर्व आरोपी पळून गेले. दरम्यान, तिघांना दारोडा टोल नायावर पकडून वरोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर मुख्य आरोपी गीतेश सातपुते याने सरेंडर केले होते. त्यानंतर ३ रोजी अन्य आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता या सर्वांनाच ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
 
पुढील तपास एसडीपीओ संतोष बकल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटके करीत आहेत. सदर प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकार्‍यांकडे देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0