सेलडोह जवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

04 Mar 2026 19:51:28
सेलू,
car-collision-near-selldoh : वर्धा-नागपूर महामार्गावर सेलडोह पोलिस चौकीजवळ मंगळवार ३ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वर्धेकडून नागपूरच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अरुण थाटे (५४) रा. जोशीनगर सेलूय यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण थाटे दुचाकीने नागपूरकडे जात होते. दरम्यान, सेलडोह जवळील सिंदी पोलिस चौकीजवळ मागून येणार्‍या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. जखमीला उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सिंदी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. तक्रारीवरून सिंदी पोलिसांनी कार चालक रोशन चौधरी (३२) रा. निमखेडा याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
 
 

agg 
Powered By Sangraha 9.0