विनयभंग प्रकरणात लगेच आराेपपत्र दाखल

04 Mar 2026 12:15:26
अनिल कांबळे
नागपूर,
molestation case शेजारी राहणारा 55 वर्षाचा व्यक्ती एका 28 वर्षीय विवाहित महिलेकडे बघून नेहमी ईशारे करणे, अश्लील शब्दांचा वापर करणे, तिला प्रभावित करण्यासाठी तिचा पाठलाग करीत हाेता. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने बेलतराेडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांची भेट घेतली. कवाडे यांनी चाेवीस तासांच्या आत गुन्हा दाखल करुन सर्व प्रक्रिया पार पाडत न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. बेलतराेडी पाेलिसांच्या तत्परतेमुळे महिलांचा पाेलिसांवरील विश्वास दृढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
 

विनयभंग  
 
 
बेलतराेडीत राहणारा आराेपी हा समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मिरवताे. अनेक कार्यक्रमांध्ये ताे भाषण किंवा अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवताे. त्याची शेजारी राहणाèया 28 वर्षीय महिलेवर वाईट नजर हाेती. ताे तिला प्रभावित करण्यासाठी वारंवार महिलेशी बाेलण्याचा प्रयत्न करीत हाेती. तिला मदत करण्याचे आश्वासन देणे किंवा तिला माेबाईल क्रमांक देण्याबाबत हट्ट करीत हाेता. महिलेने त्याची इरादा ओळखून त्याच्यापासून दुरावा निर्माण केला. त्यामुळे ताे चिडला. त्याने तिचा पाठलाग करणे सुरु केले. तसेच तिला बघण्यासाटी तिच्या घरासमाेर उभे राहणे सुरु केले.molestation case या प्रकाराला ती महिला कंटाळली. तिने त्याची भेट घेतली आणि समजूत घातली. मात्र, ताे समजून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे महिला हतबल झाली हाेती.
पाेलिसांमुळे मिळाली सुटका
आराेपीच्या त्रासाला कंटाळून महिला पाेलिस ठाण्यात आली. ठाणेदार कवाडे यांनी तिची कैीयत ऐकली आणि ताबडताेब कारवाईची प्रक्रिया सुरु केली. चाेवीस तासांच ई-साक्ष आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करुन थेट आराेपपत्र न्यायालयात दाखल केले. बेलतराेडी पाेलिसांच्या विनयभंग प्रकरणात लगेच आराेपपत्र दाखल या तत्परतेमुळे महिलांचा विश्वास वाढला आहे.
Powered By Sangraha 9.0