मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी ग्रापंना भारत गणेशपुरे देणार भेट

04 Mar 2026 20:13:44
वर्धा, 
bharat-ganeshpure : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ७ रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेता भारत गणेशपुरे जिल्ह्यातील अभियानात सहभागी असलेल्या ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांना प्रोत्साहन देणार आहे.
 
 

jkl 
 
 
 
मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कारंजा तालुयातील भालेवाडी, वर्धा तालुयातील सालोड (हिरापूर) तर समुद्रपूर तालुयातील कानकाटी या तीन ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. ग्रामपंचायतीनी अभियानांतर्गत केलेल्या कामांची पाहणी करुन ग्रामपंचायतीना प्रोत्साहन देणे, ग्राम विकासाला चालना मिळावी व अभियानाची अधिक प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी ग्रामस्थांचा उत्साह वाढविणे हा या भेटीमागील मुख्य हेतू आहे.
 
 
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.
 
 
ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.
 
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीं या अभियानामध्ये सहभागी झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन हे अधिकारी अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अमोल भोसले व संबंधित सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना घेऊन प्रत्येक तालुयातील ग्रामपंचायतीची पाहणी करत आहेत.
 
 
ग्रामस्थांनी या अभियानात लोकसहभाग द्यावा व श्रमदानातून ग्रामविकासाची लोक चळवळ उभी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0